बारामतीत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ३० हजारांची लाच घेताना ACB च्या जाळ्यात…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

दाखल झालेल्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी हजाराची लाच स्वीकारताना बारामती शहर पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.एसीबीने रविवारी ही कारवाई केली आहे.याप्रकरणी लाचखोर पोलीस उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे,यामुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.सहायक पोलीस उपनिरीक्षक संदिपान अभिमान माळी (वय.५६ ) असे कारवाई केलेल्या
केलेल्या लाचखोर पोलीस अधिका-याचे नाव आहे.बारामती
शहर पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहे.याबाबत एका ४२ वर्षीय तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार तक्रारदारांच्या पत्नीने सावकारी कायद्या अन्वये दाखल केलेल्या गुन्हयाचे चार्जशिट त्यांचे बाजूने पाठवण्यासाठी माळी यांनी तक्रारदांराकडे तब्बल ४० हजारांची मागणी केली होती. मात्र तडजोडीअंती ३० हजार रुपये देण्याचे ठरले होते.त्यानुसार ३० हजारांची लाच स्वीकारतांना माळी यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.

ही कामगिरी पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे,अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक,पोलीस निरीक्षक भारत साळुके, पोलीस हवालदार नवनाथ वाळके, भुषण ठाकुर, चंद्रकांत कदम या पथकाने ही कारवाई केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *