भोंदुबाबा मनोहर भोसलेला न्यायालयीन कोठडी…!! नाथबाबा पोलिसांना सापडणार का ??


करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज संपादक : विकास कोकरे

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील बलात्कारप्रकरणी अटकेत असलेला मनोहर भोसलेला करमाळा न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला पोलिसांनी न्यायालयापुढे हजर केले होते.भोसले हा दहा दिवसांपासून करमाळा पोलिस ठाण्यात अटकेत होता.शुक्रवारी करमाळा पोलिसांनी तपासासाठी सात दिवसाची वाढीव पोलिस कोठडी मागितली होती.परंतु न्यायालयाने न्यायालयीन कोठडी रवानगी केली आहे.बारामती येथील न्यायालयातून न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर करमाळा पोलिसांनी भोसलेला ताब्यात घेऊन तपास सुरू केला होता.पहिल्यांदा पोलिस कोठडीत असताना भोसले आजारी पडल्याने चार दिवस पोलिसांना तपास करता आला नाही.

त्यानंतर दुसर्यांदा चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही कोठडी संपल्यामुळे पुन्हा एकदा न्यायालयात उभे केले.तपास पूर्ण झालेला नाही,त्यामुळे पुन्हा पोलिस कोठडीची मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली.भोसलेचे वकील राहुल गायकवाड यांनी तपास अधिकारी हे वेळ मारून नेत आहेत,असे सांगत तेच तेच कारणे पुढे करत असल्याचा युक्तीवाद केला.सर्व बाबींचा विचार करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी घोडके यांनी भोसलेला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.भोसलेला जामीन मंजूर व्हावा यासाठी पुढील सुनावणीसाठी आपण बार्शी येथील सत्र न्यायालयात जाणार आहे, असे अॅड. गायकवाड यांनी सांगितले.

विशेष म्हणजे मनोहर भोसले बरोबर त्याचा साथीदार असणारा विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा अजूनही फरार आहे, विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा हा मनोहर भोसलेचे पूर्णपणे आर्थिक व्यवहार पाहत होता,मनोहर भोसलेला कोठडीत बसवून नाथबाबा हा भोसलेची दिशाभूल तर करीत नाही ना ? मनोहर भोसलेकडे येणार पैसा कुठे व कसा ठेवायचं हे सगळं विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा करत असल्याची चर्चा देखील रंगली आहे. त्यामुळे विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा पोलिसांना सापडत नसल्याने करमाळा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ? यामुळे आता करमाळा पोलीस नाथ बाबांना कधी पकडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *