पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( उपसंपादक : सुरज सवाणे )
लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या स्पायनल मस्कुलर अट्रोफी या दुर्मिळ आजारावरील महागड्या उपचारावरील सुविधा पुणे महानगरपालिकेमार्फत महानगरपालिकेच्या रुग्णालयात सुरू करण्यात यावी व जीनोम सिक्वेसिंग लॅब सुरू करण्यात यावी.दुर्मिळ आजारापासून लहान मुलांना वाचवण्यासाची गरज आहे,या आजारावरील उपचाराचा खर्च कोट्यावधी रुपयांच्या घरात आहे काही दिवसापूर्वी पुण्यातील वेदिका शिंदे या बालिकेचे निधन झाले होते.तिला सोळा कोटी रुपयांचे इंजेक्शन देण्यात आले होते मात्र तरीही तिचे प्राण वाचू शकले नाही.या आजारावरील इंजेक्शन इतके महाग असल्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्य लोकांना अशा प्रकारचे महागडे इंजेक्शन विकत घेणे शक्य होत नाही.
एका इंजेक्शनची किंमत एवढी महाग आहे,की या आजारावरील निदान करणे सुद्धा महाग आहे. त्यामुळे लहान मुलांना मोठया प्रमाणावर प्राण गमवावे लागतील म्हणून या आजाराचे गांभिर्य लक्षात घेऊन सदरचे स्पायनल मस्कुलर अट्रोपी आजारावरील मोफत उपचार व जिनोम सिक्वेसिंग लॅब सुरू करावी लहान मुले ही देशाची भविष्य आहेत त्यांच्या प्राणांची सुरक्षा सरकारने घ्यावी अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष सागर भाऊ जाधव यांनी उप महापौर,पुणे आयुक्त,आरोग्य प्रमुख यांना प्रत्यक्ष भेटून केली.या आजाराचा गांभीर्यपूर्वक विचार करून येत्या मुख्य सभेत प्रस्ताव ठेऊ असे आश्वासन उपमहापौर यांनी दिले.