फलटण पोलिसांचा अवैध हातभट्टी अड्ड्यावर छापा… तब्बल ३ लाख १४ हजारांचा मुद्देमाल केला हस्तगत…!!


फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूक नेटवर्क..

फलटण तालुक्यातील मुंजवडीत एकाच ठिकाणी असलेल्या तीन वेगवेगळ्या अवैध हातभट्टी दारू अड्यावर छापा टाकून फलटण पोलिसांनी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन व हातभट्टी दारू असा ३ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,फलटण तालुक्यातील मुंजवडी येथील भिवरकरवस्ती शेजारील ओढ्याजवळ एकाच ठिकाणी असलेल्या तीन वेगवेगळ्या हातभट्टी दारू अड्डयांवर छापा टाकून वसंत नारायण पवार वय.७० शंकर राजेंद्र मसुगडे वय.२३ ,मनोज विजय पाटोळे (वय.२५) सर्व रा.धर्मपुरी,ता.
माळशिरस,जि.सोलापूर यांच्याकडे १लाख ८९ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल,तसेच अर्जुन छगन जाधव (वय.२५,रा. हणमंतवाडी,ता.फलटण) याच्याकडे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल,संगीता बल्या भोसले (वय.४५,रा.मुंजवडी, ता.फलटण यांच्याकडे ७० हजार ८०० रुपयांची बेकायदेशीर हातभट्टीसह इतर साहित्य आढळून आले.

यामध्ये ५० लीटर तयार झालेली हातभट्टी दारू,२२०० लीटर हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, बाभळीची साल,पातळ गुळ, खराब बॅटरी,गॅस सिलेंडर इत्यादी साहित्य असा एकूण ३ लाख १४ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनवणे,पोलीस उपनिरीक्षक अरगडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *