दौंड पोलिसांनी खंडणीच्या व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला घेतले ताब्यात…!!


दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क

मागील तीन वर्षापासून खंडणीच्या व दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार असलेल्या आरोपींना दौंड पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले, असून,अनिकेत अरविंद सोनवणे (रा.वडार गल्ली,दौंड ) हा गेल्या एका महिन्यापासून फरार होता,तर निलेश गणेश कदम(रा.सिद्धार्थ नगर, दौंड) हा मागील तीन वर्षापासून
पोलिसांना चकवा देत होता.या दोघांना पकडण्यात येथील गुन्हे अन्वेषण शोध पथकाला यश आले आहे.या पथकाने कोम्बिंग
ऑपरेशन राबवून या आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींवर शासकीय कामात अडथळा करणे,घरफोडी,आर्म ऍक्ट,दरोडा, बेकायदेशीर जमाव जमवून दंगा करणे,असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.ही कामगिरी पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी,पोलीस हवालदार सुभाष राऊत, पोलीस नाईक अमोल गवळी, किरण राऊत,सचिन बोराडे,आदेश राऊत,अमोल देवकाते,निखिल जाधव यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *