इयत्ता अकरावी फौंडेशचा कोर्स म्हणजे नक्की काय ?? याबाबत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा.काळे सर यांचे मत …!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज संपादक : विकास कोकरे

कोरोना महामारीने संपूर्ण भारतात नव्हे,तर जगात थैमान घातले असून,याच पार्श्वभूमीवर शासनाने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून जे विद्यार्थी दहावीचे शिक्षण घेत आहेत अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणे शक्य नसल्याने दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपसूकच आनंदाची आणि सुवर्ण संधीची बाब आहे.आता आनंद,इथपर्यंत ठीक आहे,मात्र विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी कशी असेल ?? असे विद्यार्थ्यांना वाटेल…मात्र दहावीची परीक्षा झाल्यानंतर पुढे काय करायचे ? असा गोंधळ ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना व आपसूकच त्यांच्या पालकांना होत असेल..मात्र आता पालकांनी गोंधळ करून घेण्याची वेळ नाहीये..कारण सध्या स्पर्धेचे युग आहे,या युगात विद्यार्थी आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असतात,मात्र त्यांना योग्य वेळी योग्य मार्गदर्शन व सल्ला मिळाला पाहिजे..

कारण हीच योग्य सुवर्णसंधी आहे, मुलांसाठी योग्य ते करियर बनविण्याची व योग्य ते मार्गदर्शन घेण्याची व यासाठीच ग्रामीण व शहरी भागातील मुलांना योग्य ते मार्गदर्शन व सल्ला मिळण्यासाठी बारामतीच्या क्रिएटीव्ह सायन्स अकॅडमी कोचिंग क्लासने दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अकरावी फौंडेशनबाबत एक वेगळा पॅटर्न तयार केला आहे.याबाबत क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमीचे संचालक प्रा.काळे सर यांनी अतिशय योग्य आणि मार्गदर्शक माहिती दिली आहे.

नक्की ११ वी फौंडेशन कोर्स म्हणजे नेमके काय ?? याबाबत अकॅडमीचे संचालक प्रा.काळे यांनी माहिती दिली की,१० वी व ११ वी यांच्या नॉलेजचा तसेच १० वीच्या कन्सेप्ट चा मेळ घालणे म्हणजे फौंडेशन कोर्स होय…क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी मध्ये फौंडेशन कोर्ससाठी प्रत्येकी चार विषयाचे ४५ मिनिटांची तासिका घेतली जाते.यामध्ये भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र,
जैविकशास्त्र,गणित यांचा समावेश आहे,यामध्ये ११ वी मधील ह्या चार विषयातील अगदी छोट्या छोट्या गोष्टींची सविस्तर माहिती व याबाबत मार्गदर्शन केले जाते.यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे वेळ वाया न घालवता,गाफील न राहता फौंडेशन कोर्स जॉईन केला पाहिजे,असे मत काळे सर यांनी व्यक्त केले.यामध्ये वेगवेगळ्या शाळेतून विद्यार्थी येत असतात,त्यामुळे प्रत्येक ग्रामीण भागातील शाळेची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असते,अशा परिस्थितीत त्यांना व शहरातील विद्यार्थ्यांना एक प्रोग्रॅम राबवावा लागतो,यातूनच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते,यातूनच त्यांच्या करियरची दिशा ठरली जाते.फौंडेशन कोर्समध्ये बेसिक टेक्नॉलॉजी शिकवली शिकवली जाते.

ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर करण्यासाठी व घुसमटपणा दुर करण्यासाठी फाउंडेशन कोर्सची अत्यंत गरज असते.यामध्ये फाउंडेशन कोर्समध्ये कोणत्या परीक्षांसाठी कोणत्या प्रकारे तयारी करावी लागते ? याची सगळी माहिती करून घेण्यासाठी फौंडेशन कोर्स करणे खूप गरजेचे आहे. यामुळे अकॅडमीचे संचालक प्राध्यापक काळे यांनी असे सांगितले की,अकरावीमध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासावर दुर्लक्ष केले तर त्याच्या पुढच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही,यामुळे अकरावीचा अभ्यास केला तर करियर ब्राईट होण्याची संधी मोठ्या प्रमाणावर असते. तसेच पालकांवर येणारा आर्थिक बोजा देखील कमी होतो. असे मत अकॅडमीचे संचालक प्रा. काळे यांनी व्यक्त केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *