मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क..
पोलीस महासंचालक संजय पांडे आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना सीबीआयने समन्स बजावल्याची माहिती सीबीआयच्या खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयकडून याबाबत अधिकृत माहिती जारी करण्यात आली नाही.पण सीबीआयकडून थोड्याच वेळात कुंटे आणि पांडे यांना कधी आणि किती वाजेपर्यंत चौकशीसाठी सामोरे राहायचं,याबाबत सविस्तर माहिती देणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यानंतर त्याबाबतची सविस्तर माहिती समोर येईलच.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित १०० कोटी वसुली
प्रकरणी सीबीआयची चौकशी सुरु आहे.विशेष म्हणजे ईडीकडून देखील या प्रकरणी चौकशी सुरु असून,सीबीआयने याप्रकरणी चौकशी करताना अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंद केले आहेत.त्याच तपासाचा एक भाग म्हणून संजय पांडे आणि सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदविला जाणार असल्याची खात्रीशीर माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे.