दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क
क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त दौंड तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संभाजी ब्रिगेड सोलापूर पंढरपूर विभागाचे जिल्हा अध्यक्ष सचिन जगताप हे उपस्थित होते.यावेळी जगताप बोलत होते, राज्यामध्ये आजच्या घडीला प्रमुख गणल्या जाणाऱ्या राजकीय पक्षांचे हात भ्रष्टाचारामध्ये बरबटलेले असून सहकारातून पैसा कमावणे आणि तोच पैसा वापरून सत्ता कमावणे हाच पायंडा पाह्यला मिळत आहे. मात्र संभाजी ब्रिगेडच भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देईल, ताकदीनिशी लढा परिवर्तन घडेल असा विश्वास त्यांनी यावेळी पदाधिकार्यांना दिला. तद्नंतर पदाधिकारी निवडी ही करण्यात आल्या, शिवश्री. वैभव शितोळे यांची दौंड तालुका ऊपाध्यक्ष पदी (पाटस- गट) निवड करण्यात आली.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी जिल्हा उपाध्यक्ष सुनिल पासलकर, जिल्हा सचिव विनोद जगताप,जिल्हा कार्याध्यक्ष रमेश चव्हाण ,जिल्हा सरचिटनीस सचिन अनपट,शेतकरी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निलेश जांबले,सोशल मिडिया प्रमुख अमर फुके, ऊपस्थित होते.यावेळी बारामती तालुका अध्यक्ष तुषार तुपे,इंदापुर तालुका अध्यक्ष मकरंद जगताप तसेच संभाजी ब्रिगेड दौंड तालुका व बारामती ,इंदापुर चे पदाधिकारी व कार्यकरते ऊपस्थित होते.प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुनिल पासलकर यांनी केले तर कुलदिप गाढवे-देशमुख यांनी आभार मानले.!