महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज नेटवर्क :
जरंडेश्वर साखर कारखान्याने जिहे कटापुर जलसिंचन योजनेच्या तब्बल ११ एकर जागेवर,अतिक्रमण करून वॉल कंम्पाउंड,रस्ते तसेच पक्के बांधकाम केले असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात करावी,अन्यथा याबाबत न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ असा इशारा भाजपच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव कांबळे यांनी दिला आहे.
याबाबत कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजनेत चिमणगांव येथील जरंडेश्वर साखर कारखान्याच्या
मालकीची गट क्र.७९५ पैकी ८० आर व गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रा.लि.मुबई यांच्या मालकीची गट क्र.८०८ पैकी ७५ आर जमीन शासनाने राजपत्राने संपादीत केली.शिवाय अन्य ५ शेतकरी याची एकूण १० एकर १३ आर जमीन संपादीत केली आहे.दि.२३ ऑक्टोबर २०१२ रोजी नोंदी मंजूर झाल्या असुन,या क्षेत्राचे कब्जेपट्टी दि.१० जुलै २०१५ रोजी झाली आहे.या संपादीत क्षेत्रावर जरडेश्वर साखर कारखान्याने दंडेलशाहीने २० फुट उंचीचे वॉल कंपाऊड करून पक्के बांधकाम,ऊस वाहतुकीस रस्ता केला आहे.यासाठी अंदाजे ५ ते ६ लाख ब्रास डबर,मुरूम याचे बेकायदेशीर उत्खनन करून रॉयल्टीपोटी मिळणारा शासनाचा कोट्यवधीचा महसुल बुडवला असल्याचा आरोप देखील भाजपाच्या ज्येष्ठ नागरिक आघाडीचे जिल्हा संयोजक बबनराव कांबळे यांनी केला आहे.