भोंदुबाबा मनोहर भोसलेला केले न्यायालयात हजर, १ ऑक्टोबर पर्यत पोलीस कोठडी…!!!


करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (संपादक : विकास कोकरे)

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील श्रद्धेचा बाजार मांडत फसवणूक करणारा व बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर भोसले उर्फ मनोहर मामाची सध्या सोलापूर येथील रूग्णालयातून सुटका झाल्याने मंगळवारी भोसलेला (ता.२८) करमाळा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी भोसलेला १ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.भोंदूबाबा भोसले याला करमाळा पोलिसांनी २० सप्टेंबरला करमाळा न्यायालयात हजर केले होते.तेव्हा त्याला न्यायाधीश आर.ए.शिवरात्री यांनी सात दिवसांची सोमवारपर्यंत पोलीस कोठडी दिली होती. पोलिसांकडून तपास सुरु असताना त्यांची तब्येत बिघडल्याने सोलापुरात रुग्णालयात दाखल केले होते.

सोमवारी (ता. २७) कोठडी संपल्याने तपासणी अधिकारी पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांनी न्यालयात त्याचे वैद्यकिय कागदपत्रे दाखल करत उपचार सुरू असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.त्यानंतर न्यायाधीश आर. ए. शिवरात्री यांनी भोसले यास १० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली होती,मात्र भोसलेची सोमवारी रात्री रूग्णालयातून सुटका झाल्यानंतर पुढील तपासासाठी पोलिस कोठडीत घेणे आवश्यक असल्याने कोकणे यांनी मंगळवारी (२८) न्यायालयात हजर केले.तेव्हा १ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *