प्रेमविवाहाचा राग मनात धरून तरुणावर हल्ला,पत्नीचे केले अपहरण…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

प्रेमविवाह केला म्हणून त्याचा राग मनात धरून तरुणाला जबर मारहण करत त्याच्या पत्नीचे जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण केल्याची घटना बारामती मध्ये घडली,असून संबंधित महिलेच्या चुलत भावाने आपल्या काही मित्रांसह हे कृत्य
केले असून,विठ्ठल हनुमंत माळवदकर (मूळ रा.बाभुळगाव दुमाला,सध्या रा.बारामती) यांनी याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात सहा जणांसह दोन अनोळखी इसमांनवर भादवी कलम ३६३,३२४,३२३, ५०४,५०६,१४३,१४७१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये आरोपी प्रशांत दादासाहेब गायकवाड (रा.कर्जत, जि.अहमदनगर )पप्पू कवडे,राहुल खरात ( पूर्ण नावे माहीत नाही ) दोन्ही (रा.कात्रज,ता.करमाळा,जि.सोलापूर)गोपीनाथ
भाऊसाहेब गायकवाड ( रा.कर्जत,जि.नगर ) व दोन अनोळखी इसम ( नाव पत्ते माहीत नाही )यांच्यासह दोघा अनोळखींवर गुन्हा दाखल झालेला आहे.

फिर्यादी माळवदकर याने नात्यातीलच मुलीशी पळून जावून प्रेमविवाह केला.या विवाहाला त्या महिलेच्या घरच्यांनी विरोध केला होता.त्यामुळे त्यांनी पळून जाऊन रजिस्टर लग्न केले होते.त्यानंतर हे दोघे बारामती मधील एक भाडोत्री खोलीत राहत होते. रविवारी ते खरेदीसाठी बाहेर गेले असल्याने,यावेळी पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार व काळ्या रंगाची क्रियेटा कार या गाडीतून खाली उतरून आले.त्यात फिर्यादी माळवदकर यांच्या पत्नीचा चुलतभाऊ प्रशांत,गोपीनाथ व त्यांचे मित्र होते.त्यांनी प्रेमविवाह केलेला मान्य नव्हता राग मनात धरून माळवदकर यांना हॉकीस्टीकने,हाताने,लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. माळवदकर याला पकडून ठेवत एका मोटारीत त्यांच्या पत्नीला मारहाण करत जबरदस्तीने मोटारीत बसण्यास भाग पाडत तिचे अपहरण करण्यात आले.त्यानंतर पुन्हा फिर्यादी माळवदकर याला मारहाण करत तिघे दुसऱ्या गाडीतून निघून गेले.घटनेनंतर फिर्यादी माळवदकर याने तालुका पोलिस ठाणे गाठले. औषधोपचार केल्यानंतर याप्रकरणी त्यांनी तक्रार दाखल केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *