फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी… कत्तलीसाठी ठेवलेल्या ६९ जनावरांची केली मुक्तता…!!


फलटणच्या गोतस्करांना शिव शंकर स्वामींचा दणका…

फलटण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

फलटण शहरातील कुरेशीनगर येथे राहणाऱ्या इरफान याकूब कुरेशी याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये तीन जर्सी गायी,५४ जर्सी गायीची खोंडे व १२ देशी गायी असे एकूण ६९ जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर डांबून ठेवलेल्या स्थितीत आढळून आल्याची माहिती फलटण ग्रामीण पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी पाहणी केली असता तिथे जनावरे आढळून आल्याने आरोपी इरफान याकूब कुरेशी (रा.कुरेशीनगर,फलटण )याच्या विरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार,दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास विडणी गावाच्या हद्दीमध्ये इरफान याकूब कुरेशी याच्या मालकीच्या गोठ्यामध्ये अंदाजे ९० हजार रुपये किमतीच्या तीन जर्सी गायी, चोपन्न हजार रुपये किमतीचे दोन ते तीन दिवसाची ५४ जर्सी गायीची खोंडे व दोन लाख ४० हजाररुपये किमतीची एक ते पाच वर्षे व याची १२ देशी गायी असे एकूण तीन लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.कारवाईत मानद पशु कल्याण अधिकारी यांनी पोलिस प्रशासनाला मोलाचे सहकार्य केले.याबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आरागडे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *