बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( उपसंपादक : सुरज सवाणे )
कोरोना काळात कोणी मदतीला येत नाही, पण बारामती तालुक्यातील शिर्सुफळ गावातील युवा उद्योजक,सामाजिक कार्यकर्ते तुषार शिंदे याला अपवाद आहे.शिंदे यांनी किराणा किट,अन्नदान वाटप,फळवाटप या सोबत लोकांना हॉस्पिटलसाठी सुद्धा स्वखर्च करून मदत केलेली आहे.याचे उत्तम उदाहरण आज आले ज्या वेळी एका तरुणाला तुषार शिंदे उद्योजक यांनी रक्ताच्या बॅग साठी स्वखर्च करून मदत केली.
तरुण मुलांना रोजगारासाठी त्यांचा मोठा प्रयत्न असतो. शिर्सुफळ या गावातील एक तरुण राजू शिंदे याला आज हॉस्पिटल मध्ये रक्ताच्या बॅगची गरज होती,त्याला ती बारामती मध्ये उपलब्ध होत नव्हती त्यामुळे त्याने तुषार भाऊ शिंदे यांना संपर्क साधला आणि मदत मागितली तुषार भाऊ यांनी सुद्धा तात्काळ भिगवण मधून रक्ताची बॅग उपलब्ध करून राजू शिंदे याला हॉस्पिटल मध्ये पोहोच केली.रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांनी तुषार शिंदे युवा मंचचे आभार मानले.यावेळी तुषार भाऊ शिंदे युवा मंचचे उमेश जगताप,प्रमोद बोराटे,महेश शिंदे उपस्थित होते.