करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( मुख्यसंपादक : विकास कोकरे )
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर भोसले हा आजारी असल्याने व त्याच्यावर सोलापूरातील रूग्णालयात उपचार सुरू असल्याने करमाळा पोलिसांनी वैद्यकीय उपचार सुरू असल्याचे सोमवारी (ता.२७) पेपर दाखल करत तुर्त न्यायालयीन कोठडीची मागणी केली आहे.त्यानुसार मनोहर भोसलेला न्यायाधीश आर.ए. शिवरात्री यांनी तुर्त न्यायालयीन कोठडी दिली आहे.महिलेवरील बलात्कार प्रकरणात मनोहर भोसलेला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याविरुद्ध बारामती पोलिसातही गुन्हा दाखल आहे.तेथुन त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती.त्यानंतर गेल्या सोमवारी (20 सप्टेंबरला) करमाळा न्यायालयात हजर केले असता,करमाळा न्यायालयाने मनोहर भोसलेंला सात दिवसाची पोलिस कोठडी मंजूर केली होती.
तेव्हा पोलिसांनी १० दिवसांची पोलिस कोठडी मागितली होती. सोमवारी (ता. २७) ही पोलिस कोठडी संपत होती,दरम्यान भोसले यास त्रास होवू लागल्याने आगोदर करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते,त्यानंतर सोलापूर येथील जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.आज त्याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने तपास अधिकारी पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी भोसलेवर उपचार सुरू असल्याचे पेपर दाखल करत तुर्त न्यायालयीन कोठडीची मागणी केली. उपचार संपल्यावर पुन्हा पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे. दरम्यान पोलिसांच्या अहवालानुसार न्यायाधीश शिवरात्री यांनी भोसलेला तुर्त न्यायालयीन कोठडी दिली आहे.