यवत : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
यवत पोलिस ठाण्यात कासुर्डी दौंड आयडीबीआय बँक शाखेतील मॅनेजर आशिषकुमार पंचानंद शर्मा यांनी यवत पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.या गुन्ह्यात एटीएम मशीनचा दरवाजावर असलेला पासवर्ड टाकून मशीनचा दरवाजा तोडून तब्बल ११ लाख ५८ हजार ३०० रुपये चोरीस गेले होते.यवत पोलीस ठाण्यात भादवी कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल असून,हा गुन्हा घडल्यापासून गुन्ह्यातील आरोपी केतन बाळासाहेब ढवळे (रा.खेडेकरमळा,उरुळीकांचन,ता. हवेली,जि.पुणे ) हा अद्याप फरार होता.त्याला आज ताब्यात घेत, तपासकामी यवत पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस दौड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, पोलीस हवालदार विजय कांचन,अजय घुले,पोलीस कर्मचारी धिरज जाधव यांनी केली आहे.