सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची बनावट प्रमाणपत्रे करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद…!!


पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे धडाकेबाज कामगिरी..!!

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (संपादक : विकास कोकरे)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, तसेच इतर कॉलेजेच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट हे नीरा या ठिकाणी बनावट रित्या तयार करत असल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे यांना मिळाली असता,नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेस येथे धाड टाकून तेथे बनावट प्रमाणपत्रे बनवीत असल्याची खात्री झाल्याने तेथील बनावटी करणाचे साहित्य व बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखाने नीरा येथे धाड टाकत तिघांना ताब्यात घेतले असून,आरोपी गणेश संपत जावळे (रा.नीरा,ता.पुरंदर,जि. पुणे ) मनोज धुमाळ (रा.नीरा,ता.पुरंदर,जि.पुणे वैभव लोणकर (रा.बारामती)यांना अटक करण्यात आली आहे.यावरून स्थानिक गुन्हे शाखेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जाऊन चौकशी त्यांनी नीरा येथील समीक्षा प्रिंटींग प्रेस मध्ये जाऊन पाहणी करत,पथकासह धाड टाकली असता,मोठ्या प्रमाणावर बनावट प्रमाणपत्रे व गुणपत्रिका बनवण्याचे काम सुरू होते.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप येळे,पोलीस हवालदार रविराज कोकरे,अनिल काळे,सचिन घाडगे,पोलीस नाईक गुरू जाधव,अभिजित एकशिंगे,स्वप्नील अहिवळे,अजय घुले,राजू मोमीन,प्रसन्ना घाडगे यांनी केली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *