बारामती नगरपरिषद मधील सोलर प्रकल्पाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…!!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० अंतर्गत महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण अपारंपारिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बारामती नगर परिषद इमारत येथे आस्थापित केलेल्या सौर विद्युत संचाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोलर प्रकल्पात एकूण १७९ पॅनल असून त्याची क्षमता ६० के.व्हीची आहे.हा एक चांगला प्रकल्प असून या प्रकल्पामुळे वीज बील कमी येण्यास मदत होईल. नगररिषद इमारतीत स्वच्छता असायला हवी. परिसर सुंदर आणि निट नेटका दिसला पाहिजे. परिसरात अनधिकृत होर्डिग असल्यास काढून टाकावीत,असेही ते यावेळी म्हणाले.हा प्रकल्प पुर्णत्वाकडे नेण्यासाठी सहकार्य केलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरपरिषदेच्या अध्यक्षा पौर्णिमा तावरे,एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, सभापती बांधकाम समिती सत्यवान काळे, नगरपरिषदेचे सदस्य, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,तहसिलदार विजय पाटील,गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *