बारामतीमधील विकासकामे वेळेत पूर्ण करा,उपमुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामतीमधील विकास कामांचा दर्जा चांगला राहील याची दक्षता घ्या आणि सर्व कामे वेळेत पूर्ण करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती मधील प्रशासनाला दिले.पवार यांनी कऱ्हा नदी सुशोभिकरण प्रकल्पातंर्गत दशक्रिया विधी घाट,एसटी स्टॅन्डचे नवीन बांधकाम व परकाळे बंगला येथील कॅनलवरील सुशोभिकरण कामाची पाहणी केली.

विकास कामांची पाहणी करतांना उपमुख्यमंत्री पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. सर्व विभागांनी विकास कामे समन्वयाने पार पाडावीत. निधीचा योग्य पद्धतीने वापर करावा.निधीची आवश्यकता असल्यास संबंधित विभागाने प्रस्ताव सादर करावेत.सार्वजनिक कामे चांगली व वेळेत होण अपेक्षित आहेत.अपूर्ण कामांबाबत संबंधित विभागाने माहिती घेऊन ती वेळेवर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा. शहरातील रस्त्यावरील खड्डे लवकर भरुन घ्यावेत.सर्वच विभागानी जबाबदारी स्वीकारून कामे करणे आवश्यक आहे,असे त्यांनी सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे,अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते,एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर,उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव,गटनेता सचिन सातव,तहसिलदार विजय पाटील,मुख्याधिकारी महेश रोकडे,गटविकास अधिकारी अनिल बागल,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *