‘सीएमआयएस’ पोलीस प्रशासनाला पोहचवणार गुन्हेगारांच्या घरापर्यंत…बारामतीत आज उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन…!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

पुणे ग्रामीण व सोलापूर ग्रामीण यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या
‘सीएमआयएस’ चा वापर रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरापरापर्यंत पोहोचण्यासाठी आता रेकार्ड वरील गुन्हेगारांचा पत्ता व इतर माहिती एकत्रित करून ती एका मोबईल अपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांच्या संकल्पनेतून हे नवे मोबाईल अप विकसित करण्यात आले असून,आज याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित बारामती येथे पार पडले जाणार असून,पोलीस दलासाठी सॉफ्टवेअरचे हस्तांतरण करण्यात आले आहे.

पहिल्या टप्प्यात सप्टेंबर मधील रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची सर्व माहिती भरून घराचे पत्ते व अद्यावत फोटो भरली जाणार आहे.यामुळे बदलून आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आरोपीचे नेमके राहण्याचे ठिकाण करण्यास मदत होणार आहे. ब्रिटिशकाळापासून पोलीस दलाच्या रेकॉर्ड मध्ये आरोपीचे हिस्ट्री शीट करण्याची पद्धत आहे.आता बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना कमी वेळेत आरोपीची संपूर्ण माहिती अचूक मिळावी यासाठी हे अँप मदतीचे ठरणार आहे.

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पिपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक,सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक,रायगडचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे,पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते आणि ‘सीएमआयएस’ सॉफ्टवेअर मार्क टेक्नॉलॉजीचे संचालक मंगेश शितोळे उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *