पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्युज (उपसंपादक : सुरज सवाणे)
तीन नगरसेवक प्रभाग पद्धत ही संविधानाने सर्वसामान्यांना मिळालेले प्रतिनिधित्वचे अधिकार हे अप्रत्यक्षपणे काढून घेणे आहे. यामुळे छोटे पक्ष व व्यक्ती या निवडणुकीमधून बाहेर फेकले जातात व हा सर्व प्रस्थापित व सत्ताधारी पक्षांचा कट आहे.हा निर्णय तर्कसंगत वाटत नाही व राजकीय हितसंबंध जपण्यासाठी घेतलेला व व्यवहारापूर्वी भाजपने केलेल्या ४ च्या प्रभागा प्रमाणेच स्थानिक नागरिकांना ‘आपला कुणीच वाली नाही’ ही भावना निर्माण करणारा ठरू शकतो. महाविकास आघाडीने यापूर्वी एक वॉर्डाचा निर्णय का घेतला? मुंबईला वेगळा निकष का? यामुळे राजकीय हितसंबंधातून हे निर्णय घेतले जाणे लोकशाही व्यवस्थेसाठी निश्चितच चांगले नाही.
या प्रकारच्या प्रभाग पद्धतीने छोट्या पक्ष्यांच्या अपक्ष सामान्य उमेदवारांना भौगोलिक आवाक्यामुळे या निवडणुका लढवणे अवघड जाते साधने जास्ती खर्ची पडत असल्यामुळे निवडणुका फक्त पैसेवाल्या लोकांकडूनच लढवल्या जातात प्रभागात अनेक नगरसेवक झाल्यामुळे प्रभागातील कामे अडचणींना जबाबदार नगरसेवक कोण ? याबद्दल शाशंकाता निर्माण होते,व यासाठीच या सर्व प्रक्रियेविरोधात न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेशाध्यक्ष सागर जाधव यांनी दिली आहे.