करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक विकास कोकरे)
करमाळा तालुक्यातील महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात करमाळा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या भोंदूबाबा मनोहर मामा भोसलेच्या छातीत गुरूवारी रात्र ११.३० वा. दुखु लागल्याने उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले आहे.उंदरगाव येथील भोंदू बाबा मनोहरमामा भोसले यांच्यावर आर्थिक फसवणूक प्रकरणी बारामती येथे व करमाळा पोलीस ठाण्यात महिलेवर अत्याचार प्रकरणी (दि. ९) एकाच दिवशी गुन्हे दाखल झाले होते. दुसऱ्या दिवशी सालपे (ता. लोणंद जिल्हा सातारा) येथून पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भोसले यांना ताब्यात घेतले.दि ११ रोजी बारामती न्यायालयात हजर केले..
यावेळी त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी मिळाली.नंतर ती वाढून १९ सप्टेंबर पर्यंत करण्यात आली होती. दरम्यान करमाळा पोलिसांनी ताब्यात घेऊन महिलेच्या आत्याचार प्रकरणात करमाळा येथे आणले. सोमवारी त्यांना करमाळा येथील न्यायालयात हजर केल्यानंतर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी शिवरात्री यांनी सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.पण गुरुवारी रात्री साडे अकरा वाजता भोसले यांना अत्यवस्थ वाटु लागल्याने त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे रात्रीच हलविण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा मनोहर मामाला खोकला येत असल्याने उपचारासाठी नेण्यात आले होते.