पुरोगामी महाराष्ट्रात महिला सुरक्षितेचे वाभाडे ?? १५ वर्षीय तरुणींवर २९ जणांचा बलात्कार…


मुंबई : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (मुख्य संपादक : विकास कोकरे)

मुंबई परिसरातील डोंबिवलीतील पंधरा वर्षीय मुलीवर २९ जणांचा बलात्कार या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे,या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नक्की चालले आहे तरी काय ? या योगाने महाराष्ट्रामध्ये जनतेने उठाव करण्याची वेळ आलेली आहे असे दिसून येत आहे. कुठल्याही राज्यकर्त्याला काही देणे घेणे उरले नाही जो तो नुसता बघ्याची भूमिका घेतो आहे आरोपींना कुठलीही बहीण राहिले नाही रोज कुठे ना कुठे राज्यात बलत्कार हत्याकांड याचा सिलसिला सुरूच आहे हे सरकार देखील गुन्हेगारी रोखण्यासाठी सपशेल अयशस्वी ठरत आहे.

मुंबईतील बलात्कार प्रकरणावरून राज्यांतील महिला नक्की सुरक्षित आहेत का ? असा सवाल उपस्थित केला जातोय.अशातच ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये घडलेल्या प्रकाराने राज्य सरकारच्या महिला सुरक्षा धोरणावर प्रशचिन्ह निर्माण झाले आहे ?? राज्यातील ही पहिलीच घटना आहे की,एका १५ वर्षीय अल्पवयीन तरुणींवर तब्बल २९ नराधमांनी,अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्राची मान शर्मेने खाली झुकली आहे.२९ जानेवारी ते २२ सप्टेंबर या आठ महिन्याच्या कालवधीत या नराधमांनी पिडीत मुलीवर डोंबिवली,बदलापूर, मुरबाड आणि रबाळे परीसरात वेळोवेळी अत्याचार करून,या प्रकारचे मोबाईलमध्ये चित्रिकरण करुन ते व्हायरल करण्याच्या धमक्या देखील पीडित तरुणीला देण्यात आल्या.असं पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटले आहे.

त्यानुसार पोलिसांनी भादवि कलम ३७६ (ड),३७६ (३),३७६ (अ) सह पोक्सो कायद्याचे कलम (४),६१० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त जयजीत सिंग,सह आयुक्त सुरेश मेकला यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस आयुक्त जय मोरे,मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दादाहरी चौरे यांनी तपास करीत या घटनेतील २३ जणांना अटक केली आहे तर अटक आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचाही समावेश आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *