बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन हद्दीत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गणेश मंडळ सर्व पत्रकार बांधव सर्व ग्रामपंचायत सर्व सामाजिक सेवाभावी संस्था,पोलीस पाटील होमगार्ड महिला दक्षता समिती तसेच नागरिकांच्या मदतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन व अक्षय ब्लड बँक पुणे यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.
आज दि.२२ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात एकूण १३१७ रक्तदात्यांनी रक्तदान केलेले असून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन कडील ३ पोलीस अधिकारी व २५ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा रक्तदान करून सक्रिय असा उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे.वडगाव पोलीस स्टेशन हद्दीत आज रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन,करंजेपुल दुरक्षेत्र,सुपा दुरक्षेत्र,पणदरे दुरक्षेत्र व मोरगाव पोलीस मदत केंद्र अशा एकूण ५ ठिकाणी एकूण १३१७ रक्तबॅग संकलन झालेले आहे.