ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना व वेदिका जॉब कन्सल्टन्सी अँड इन्शुरन्स सर्विसेसच्या वतीने रुग्णांना फळे वाटप….!!


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटना भारत व वेदिका जॉब कन्सल्टन्सी इन्शुरन्स सर्विसेस यांच्या वतीने आज बारामती येथील शासकीय रुग्णालया असणाऱ्या कोविड रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.कोरोना सारख्या जागतिक महामारीने भारतातच नव्हे तर जगभरात थैमान घातले असून रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. विविध संघटनांकडून वेगवेगळ्या प्रकारे शासन-प्रशासनाला मदत करण्याच काम या संघटनाकडून होत असताना ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत बारामतीमधील सिल्व्हर ज्युबिली शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी वेदिका जॉब कन्सल्टन्सी अँड सर्विसेसचे संचालक ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे महाराष्ट्राचे नवनियुक्त कार्याध्यक्ष कृष्णा जेवादे,ऑल इंडिया पोलीस जनसेवा संघटनेचे तालुकाध्यक्ष अस्लम शेख,जिल्हा उपाध्यक्ष अमीन शेख,महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूजचे उपसंपादक सुरज सवाणे,सामाजिक कार्यकर्ते आनंद लोंढे,ऑल इंडिया पोलीस जनसेवा कार्याध्यक्ष सोमनाथ इंगळे,जेनेरीक मेडिकलचे मालक स्वप्नील फरांदे,बबलू ननवरे, सुयोग कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *