पौड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
पौड पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना,दोन इसम संशयीतरित्या मोटार सायकलवर फिरत असताना मिळून आले,त्यांना हटकले असता ते इसम लवळे फाटयाकडे पळुन गेल्याने पोलिसांनी नाकाबंदी केली असता,ते पळुन जाण्याच्या तयारीत जात असताना,त्यांचा पाठलाग करून पकडले असता आरोपी मयुर भाऊ बवले,बाजीराव महेश अवताडे दोघे (रा.बाणेर,पुणे)येथे राहत असल्याचे सांगितले,त्यांना इकडे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने,त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता,त्यांनी पौड पोलीस ठाण्याच्या हददीत भुगाव माताळवाडी फाटा,पिरंगुट हददीत घरफोडी केल्याचे सांगितले.पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत भादवि कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा उघडकीस आला,असुन आरोपींकडून गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,पौडचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर सहाय्यक फौजदार बाबा कदम, पोलीस हवालदार अनिता रवळेकर,पोलीस कर्मचारी रॉकी देवकाते,सिध्देश पाटील,शेखर हगवणे,राजेश गायकवाड,साहील शेख यांनी केली आहे.