करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( मुख्य संपादक : विकास कोकरे )
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील अटकेत असलेल्या भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणात फसवणूक झालेले आणखी कोण तक्रारदार असतील तर त्यांनी न घाबरता पुढे यावे.तक्रारीची चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल,असे आवाहन सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी नागरिकांना केले आहे.पहिल्या आलेल्या दोन
तक्रारींपैकी एकाला नोटीस पाठवली आहे,तर दुसऱ्या
तक्रारीची चौकशी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले आहे.पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी मंगळवारी (ता.२१) करमाळा पोलिस ठाण्याला भेट दिली.
तेव्हा त्यांनी पत्रकारांशी सवांद साधला.पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यावेळी उपस्थतीत होते.पोलिस अधीक्षक सातपुते म्हणाल्या,मनोहर भोसले प्रकरणात संशयित आरोपीला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी आहे. त्यात पोलिसांचा तपास सुरु आहे यामध्ये आणखी दोन आरोपींना अटक करायची आहे.एक संशयित आरोपी बारामती पोलिसांच्या ताब्यात आहे.याप्रकरणात पोलिसांनी गांभीर्य लक्षात घेत,खूप संवेदनशील कलमे वापरलेली आहेत.तपासात काही जबाब घेतले जाणार आहेत.त्यातून जे समोर येईल त्यानुसार कायदेशीर कारवाई होईल.पुढे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की,आमच्याकडे तक्रार आल्याबरोबर सोलापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करून अर्जंट करमाळ्यात दाखल केली होती.दरम्यानच्या काळात जे संशयित आरोपी आहेत,त्यापैकी एकाला बारामती पोलिसांनी एकाला अटक केली.
कोणत्याही नागरिकांवर अन्याय अत्याचार होत असेल तर तक्रार देण्यासाठी त्यांनी पुढे यावे.पुढे बोलताना म्हणाल्या, याप्रकरणी दोन तक्रारी प्राप्त आहेत.त्यातील एकाला नोटीस दिलेली आहे. दुसऱ्या तक्रारीत प्राथमिक चौकशी सुरु आहे.त्यात काही तथ्य आढळले तर पुढील प्रक्रिया केली जाईल.कायदा हा सर्वाना समान असून कायद्यापुढे सर्व समान आहेत.भोसलेला करमाळा पोलिसांनी १९ तारखेला बारामती
पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्याच्याविरुद्ध करमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. यातील पीडितेने सातपुते यांची भेट घेतली होती.त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता.