बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अक्षय शेलार यांच्यावर खोटा व तापदायक गुन्हा दाखल केल्यामुळे गेले ७ दिवस झाले प्रांतअधिकारी कार्यालय याठिकाणी बेमुदत धरणे आंदोलनास चालू आहे त्यामध्ये काल घंटा नाद आंदोलन देखील करण्यात आले सदरील आंदोलनाच्या मागण्यामध्ये अक्षय शेलार, फिर्यादी काळे, साक्षीदार, पी आय नामदेव शिंदे यांची नार्को टेस्ट, ब्रेन मॅपिंग, लाईट डिटेक्टिग, या चाचण्या होव्या तसेच सामाजिक कार्यकर्ते, राजकीय कार्यकर्ते, पत्रकार यांच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी ३५३,सारखे गुन्हे पोलीस स्टेशनं किंवा सरकारी कार्यालयामध्ये गेली की दाखल होत असल्यामुळे त्यांना सरकारी कार्यालयात जात असताना तेथे जे काय होईल ते चित्रीकरण करण्याची परवानगी मिळावी तसेच वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हामहासचिव मंगलदास निकाळजे यांना पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी जी अपमानास्पद वागणूक दिली होती.
त्यामध्ये ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा,अक्षय शेलार वर झालेल्या खोट्या गुन्हा ची सीबीआय चौकशी करण्यात यावी तसेच अक्षय शेलार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवले असल्यामुळे ३(१)पी,३(१)क्यू ३(२)७ या ऍट्रॉसिटी च्या कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करून घ्यावा आशा मागण्या आंदोलन करते वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, अनिकेत मोहिते, अभिलाष बनसोडे, रोहित भोसले, सन्नी काकडे, सुभाष गायकवाड, आदी कार्यकर्ते यांनी केली आहे.