बारामती तालुक्यातील कुरणेवाडी येथे वीज कोसळून दोघांचा मृत्यू,एक गंभीर जखमी….


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

बारामती तालुक्यातील कुरणेवाडी सगोबाचीवाडी हद्दीतील असणाऱ्या पणदरे खिंडी परिसरात वीज कोसळली,येथील परिसरातील शेतात काम करणारे शेतकरी दाम्पत्य एका झाडाच्या आडोशाला गेले.पण,त्याच झाडावर वीज कोसळल्याने या दाम्पत्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाला आहे.बारामती तालुक्यातील कुरणेवाडी गावच्या हद्दीत सगोबाचीवाडी येथे सोमवारी (दि. २०) दुपारी साडे तीनच्या सुमारास ही घटना घडली. शेतकरी बाळासाहेब बंडोबा घोरपडे (वय ५४ वर्ष ) व त्यांची पत्नी संगीता बाळासाहेब घोरपडे (वय-४४) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.तर पद्मिनी घोरपडे या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर बारामती शहरातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घोरपडे यांची पणदरे खिंडीजवळ शेतजमीन आहे.सोमवारी दुपारी पावसाने अचानक कोसळायला सुरूवात केली.शेतात काम करणारे हे तिघे एका झाडाच्या आडोशाला बसले.पण, अचानक वीजेचा मोठा कडकडाट झाला. ही वीज त्यांनी आसरा घेतलेल्या झाडावरच कोसळली.या घटनेत ते गंभीर जखमी झाले.त्यांना तात्काळ उपचारासाठी बारामतीला हलविण्यात आले.परंतु उपचारापूर्वीच बाळासाहेब व त्यांची पत्नी संगीत यांचा मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.जखमी पद्मिनी यांच्यावर उपचार सुरु आहेत.या दुदैवी घटनेनंतर बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *