आर.पी.आयचे नेते सतीश साळवे यांनी केले उपस्थित राहण्याचे आवाहन….
जामखेड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
जामखेड तालुक्यातील नानज येथे आर.पी.आयचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमाताई यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर आयोजित करण्यात आले असून, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी नानज येथे जिल्हा
अंधत्व समिती पुणे,नोंदणीकृत साधु वासवानी संचलित के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे, सावित्रीबाई फुले ग्रामविकास मंडळ नानज यांच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब,कष्टकरी, शेतकरी यांच्यासह नानज परिसरातील महिलांसाठी नागरिकांसाठी हे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
नानज येथील सावित्रीबाई फुले ग्रामविकास मंडळ संपर्क कार्यालय बाजारतळ येथे शिबीर आयोजित केले असुन सोमवार दि.२० रोजी वेळ सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन आर.पी.आयचे युवा नेते सतिश साळवे यांनी आवाहन केले आहे.यावेळी नानज पोलिस दुरक्षेत्राचे लोंखडे,ग्रामविकास अधिकारी शेख,तलाठी गावीत,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजीराजे भोसले, मा.संरपच संतोष पवार,माजी सभापती तुषार पवार,संरपच महेंद्र मोहळकर,उपसरपंच संजय साठे,ग्रा.सदस्य लियाकत शेख,डॉ गोरख भवाळ,पत्रकार नंदू परदेशी,फारूक शेख,जमील शेख,आरपीआयचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,उपाध्यक्ष शिवाजी साळवे,युवक अध्यक्ष बाबा सोनवणे,देवा साळवे,गरडाचे पाटोदाचे माजी संरपच गफ्फार पठाणसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे.