भिगवण पोलीसांची दमदार कामगिरी…!! गांजा वाहतुक करणाऱ्याला घेतले ताब्यात…!!


भिगवण : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

भिगवण हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.भिगवण पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार,आरोपी अशोक शिवदास पवार ( वय.२१ वर्ष,रा.वांगी,ता.भूम,जि. उस्मानाबाद ) यास पोलिसांनी ताब्यात घेत,त्याच्या ताब्यातील १६ किलो गांजासह एक होंडा शाईन मोटारसायकल असा तब्बल तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला असून,आरोपीचा सहकारी पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.आरोपीवर भिगवण पोलीस ठाण्यात गुंगीकारक औषधी द्रव्य, मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क),२०(क) कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश उत्सवाच्या अनुषंगाने व रेकॉर्डवरील गुन्हेगार हद्दपार करणाच्या सुचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिल्या होत्या.त्याच अनुषंगाने गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार,भिगवणच्या हदीत जुना भिगवण राशीन रोडने, राशिन बाजुकडुन एका मोटार सायकलवरून दोन इसम बेकायदेशीर गांजा घेवुन जाणार असल्याची माहिती मिळाली होती भिगवण पोलीसांनी तात्काळ भिगवण हद्दीत जुना भिगवण राशिन रोड येथे सापळा रचुन एका मोटार सायकलवर दोन इसम पांढऱ्या गोणीमध्ये गांजाची वाहतूक करताना दिसले.
पोलीसांनी थांबविण्याचा इशारा केला असता त्यातील एक इसम पोलीसांची चाहुल लागताच पळुन गेला.पोलीसांनी शिताफीने त्याचा दुसऱ्या साथीदार आरोपी अशोक शिवदास पवार यास ताब्यात घेत, त्याच्या ताब्यातील,१६ किलो वजनाची गांजाची गोणी व वाहतूक करणारी एक होंडा शाईन मोटार सायकल असा ३,०६,००० किंमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधीकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस पोलीस अंमलदार साईराम भिसे, नवनाथ भागवत,सचिन पवार, महेश उगले,केशव चौधर,आप्पा भांडवलकर,होमगार्ड धुमाळ, सुर्यवंशी यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *