मामांचा सहकारी ओंकार शिंदेला अटक,कोर्टाने दिली तीन दिवसांची पोलीस कोठडी !
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज संपादक : विकास कोकरे
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मठ बांधून राहत,सद्गुरू संत बाळू मामांचा अवतार असल्याचे भासवून आर्थिक फसवणुकीप्रकरणी तसेच जादूटोणाविरोधी प्रतिबंधक कायद्याखाली अटकेत असलेल्या मनोहर भोसले उर्फ मामा हा पोलीस कोठडीत होता,आज मनोहर भोसलेंना बारामतीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून,यानंतर करमाळा येथील पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया
सुरू केली असून,मनोहर भोसलेंचा सहकारी याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी ओंकार शिंदे याला बारामती तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याला आज न्यायालयापुढे हजर केले असता,त्याला न्यायालयाने पोलीस प्रशासनाच्या तपासकामी तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.फसवणुकी प्रकरणी मनोहर ( मामा) भोसले याला याअगोदर सहा आणि पुन्हा तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.
याच अनुषंगाने मनोहर भोसलेंना आज बारामती न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.न्यायाधीश श्रीमती रणवीर यांच्यासमोर त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी झाली.आरोपी भोसलेंच्या बाजूने जामीन अर्जावर ऍड.रुपाली ठोंबरे,हेमंत नरूटे यांनी बाजू मांडली.सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी मनोहर भोसले याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
याच गुन्ह्यातील आरोपी ओंकार शिंदे याला बारामती तालुका पोलिसांनी अटक केली असून त्याला बारामती न्यायालयासमोर हजर केले असता,मा.कोर्टाने पोलिसांच्या तपासासाठी तीन
दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली.बारामती मधील फिर्यादी शशिकांत खरात (रा.साठेनगर,कसबा,ता.बारामती,जि.पुणे ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फसवणूक प्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायद्यानव्ये मनोहर ( मामा) भोसलेंसह विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे या दोघांवरही गुन्हा दाखल आहे.या गुन्ह्यातील आरोपी ओंकार शिंदे याला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुनावणीला सुरुवात होताना सरकार पक्षाने न्यायालयीन कोठडीची मागणी केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी याला आक्षेप घेत आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली.ही मागणी करण्यामागे तिसरा आरोपी पोलिसांमध्ये हजर झालेला असताना,एकत्रित तपास होणे गरजेचे असताना,पोलिसांनी हा एकतर तपास करू दिला नाही. त्यांची भूमिका संशयास्पद आहे. पोलिसांच्या या संशयास्पद भूमिकेबद्दल आम्ही या संदर्भात उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत असे ठोंबरे व नरूटे यांनी सांगितले.