‘Capgemini’ या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत घेतली शरद पवारांची भेट….


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

‘Capgemini’ या आयटी क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनीच्या शिष्टमंडळाने बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा मा.केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांची भेट घेतली यावेळी बारामती,कर्जत-जामखेड नगर,सोलापूर,नाशिक,कोल्हापूर, नागपूर या शहरांमध्ये आयटी सेंटर सुरू करून त्याला प्रोत्साहन देण्यासाठी काय करता येईल,यावर चर्चा करण्यात आली.

यावेळी या शिष्टमंडळाने विद्या प्रतिष्ठान आणि ‘ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टला भेट देऊन विविध प्रकल्पांचीही माहिती घेतली.यावेळी कर्जत जामखेड आमदार रोहित पवार,कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी यार्डी,कार्यकारी उपाध्यक्ष प्रसाद शेट्ये,उपाध्यक्ष जगदीश कुचम आणि कुमार अनुराग प्रताप यांचा समावेश होता.

विद्या प्रतिष्ठान,’ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट’ आणि ‘कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शिक्षण, कृषी-तंत्रज्ञान, डेअरी आदी क्षेत्रात शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली बारामतीत सुरू असलेले विविध प्रकल्प आणि त्याचा राज्यावर होणारा परिणाम हे पाहून या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *