सासवड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
ऋषिकेश पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री किराणा
दुकान बंद करून त्याचे टेम्पो मधून सासवड ते उदाचीवडी असा रोडणे घरी जाताना रस्त्यामध्ये ३ अनोळखी इसमांनी हिरो होंडा स्प्लेंडर मोटर सायकल घेऊन ऋषिकेश सुनिल पवार (वय.१९ रा.उदाचीवडी) यांना मोटर सायकल आडवी मारून तु माझ्या पायावर गाडी का घातली असा बनाव करून त्यांना गाडीतून खाली ओढून बाजूला अंधारात शेतात नेऊन लोखंडी रॉडने मारहाण करत,त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची सोन्याची चेन आणि मोबाईल असा १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल काढून घेत पळून गेले होते.या घटनेचा गुन्हा सासवड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.याच अनुषंगाने गुन्हे शोध पथकाने सासवड ते जेजुरी व हडपसर असे वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून,असे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती घेत सीआयडी ऑफिस यांच्याकडून आरोपीचे स्क्रॅच काढुन घेत तपास करीत असताना या पथकास माहिती मिळाली की,या गुन्ह्यातील आरोपी हे सातारा व सोलापूर जिल्ह्यातील असून गुन्हा करून ते कर्नाटक राज्यात व सोलापूर जिल्ह्यात
पळून गेले आहेत.
गुन्हे शोध पथकाने तात्काळ सोलापूर येथे जाऊन आरोपींची माहिती काढून घेत आरोपी रोहन संजय माने (वय.१८,रा.देगाव
जि.सातारा )ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण (वय.१८,रा. खुनेश्वर,ता.मोहोळ,जि.सोलापूर) रोहन उर्फ रॉबिन रमेश चव्हाण (वय.१९,रा.खुनेश्वर,ता.मोहोळ,जि.सोलापूर) यांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर मोटार
सायकल एम.एच.१३,सि.वाय ०९६४ तसेच रेडमी कंपनीचा
मोबाईल,दोन तोळे सोन्याची चैन,असा एकूण १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गुन्ह्यातील दोन तोळे सोन्याची चैन ही सोनार ज्ञानेश्वर तुकाराम पोतदार (वय.४०,रा. सासवड,ता.पुरंदर,जि. पुणे यांना विकली असल्याने त्याला ही अटक करण्यात आले आहे.या गुन्ह्यातील आरोपी ज्ञानेश्वर उर्फ माऊली भिकाजी चव्हाण हा मोटरसायकल चोरी करणारा रेकॉर्डवरील सराईत आरोपी असून त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते,भोर उपविभागाचे पोलिस अधिकारी धनंजय पाटील,सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनय झिंजूर्के, गणेश पोटे,विक्रम भोर,निलेश जाधव,जब्बर सय्यद,सुहास लाटणे,अभिजीत कांबळे,रुपेश भागवत,लिकायत अली मुजावर यांनी केली.