एक लाख अडोतीस हजारांचा गुटखा केला हस्तगत….
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या सोमनाथ धोडींबा गोडसे (रा.शिर्सुफळ,ता.बारामती,जि.पुणे ) येथे राहत्या घरी बेकायदा बिगर परवाना गुटख्याची विक्री करत असताना आढळून आल्याने,त्याच्या ताब्यातील असणाऱ्या गुटक्याचा तब्बल दीड लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून,त्याच्यावर प्रतिबंधक अन्न पदार्थ बंदी कलमांनव्ये,तसेच भादवी कलम ३२८,२७२,२७३ प्रमाणे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांना मिळालेल्या माहितीनुसार, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिर्सुफळ येथे आरोपी सोमनाथ धोंडिबा गोडसे (रा.शिर्सुफळ,ता.बारामती,जि.
पुणे ) येथे आपल्या राहत्या घरी मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या गुटख्याची विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती,त्यानुसार पोलीस पथकाने त्याच्या घरी छापा टाकला असता,त्याच्या राहत्या घरी तब्बल एक लाख अडोतीस हजारांचा गुटख्याचा मुद्देमाल मिळून आला,गुटख्याची विक्री व वितरण याची बंदी असल्याने आरोपी सोमनाथ गोडसे याच्यावर अन्न सुरक्षा आयुक्त यांचे प्रतिबंधीक,मुंबई अन्न पदार्थ बंदी तसेच प्रतिबंधित अन्न पदार्थ बंदी/कारवाई तसेच भादवी कलम ३२८,२७२,२७३ अनव्ये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सहा.पोलीस फौजदार पवार हे करीत आहेत.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश ढवाण,सहा.पोलीस फौजदार शशिकांत पवार,पोलीस हवालदार रमेश भोसले,पोलीस नाईक रणजित मुळीक यांनी केली आहे.