विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे ला ताब्यात घेण्याची जनसामान्यांची मागणी….
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे )
संत सद्गुरू बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवून,अनेकांची फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर (मामा) भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता बारामती जिल्हा सत्र न्यायालयाने मनोहर भोसलेंना सहा दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती.आज मनोहर भोसलेंना न्यायालयात हजर करण्यात आले होते,गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत तसेच पोलीस प्रशासनाच्या तपासाकामी मा.न्यायालयाने मनोहर भोसलेंच्या पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ केली आहे.
मनोहर मामा भोसले याला बारामती पोलिसांसह पुणे ग्रामीण गुन्हे शोध पथकाने साताऱ्यातील सालपे मधील फार्महाऊस मधून मोठ्या शिताफीने साताऱ्यात पकडले होते.त्यानंतर त्याला याअगोदर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती आज दि १६ रोजी मनोहर मामा भोसले याला पुन्हा न्यायालयात हजार करण्यात आले होते बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करीत एका व्यक्तीच्या गळ्यातील थायराईड- कॅन्सर बरा करतो,असे सांगून मनोहर मामासह तिघांनी संगणमत करीत रुग्णाच्या कुटुंबियांची दोन लाख ५१ हजार रुपये घेवून फसवणूक केली होती.हा फसवणूकीचा प्रकार मागिल तीन वर्षांपासून सुरू होता.
त्याप्रकरणी शशिकांत सुभाष खरात ( वय.२३,रा.साठेनगर कसबा,बारामती)यांनी गुरुवार रोजी तिघांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.आरोपी भोसले यांच्या बाजूने अॅड. हेमंत नरुटे यांनी म्हणणे मांडले.सरकार पक्षाकडून अॅड. एन. पी. कुचेकर यांनी काम पाहिले.मनोहर भोसले याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत,त्यांना अटक करायची आहे,मनोहर भोसलेकडे गुन्ह्यातील रक्कम व अन्य बाबींचा तपास बाकी आहे, त्यामुळे पोलिस कोठडी वाढवण्याची मागणी सरकारी वकिलानी केली होती. न्यायालयाने ती मान्य करत त्यात तीन दिवसांची वाढ केली.मनोहर भोसले विरोधात करमाळा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल असून, सध्या भोसले हा बारामती तालुका पोलिसांच्या कोठडीत आहे.येथील कोठडी संपल्यानंतर करमाळा पोलीस भोसले याला बलात्काराच्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहेत.परंतु बारामतीतील फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडी वाढल्याने सध्या तरी करमाळा पोलिसाना प्रतीक्षा करावी लागणार आहे.