स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई सुसाट…!!


तब्बल ४१ वर्षे फरार दरोडेखोरास केले जेरबंद…

पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

स्थानिक गुन्हे शाखेच्या जुन्या रेकॉर्ड वरील फरार आरोपीचा शोध घेत असताना,मिळालेल्या माहिती वरून यवत पोलिस स्टेशन येथील भादवी ३९५ या गुन्ह्यातील आरोपी अंकुश माणिक गायकवाड,(वय.५८ वर्षे, रा.खडकी,ता.करमाळा,जि. सोलापूर) हा गुन्हा घडल्यापासून तब्बल ४१ वर्षे फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास सापळा रचून करमाळा खडकी रोडवर जनावरे चरायला घेऊन फिरत असताना शिताफीने ताब्यात घेतले असून सदर गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्याने वरील गुन्हा केला असल्याचे कबूल केले आहे.

त्यास पुढील तपास करीता यवत पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शेळके,पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे पोलीस कर्मचारी विजय कांचन,धिरज जाधव,दगडू विरकर यांनी केली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *