पुणे : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (उपसंपादक : सुरज सवाणे)
पुण्याकडून साताराकडे जाणाऱ्या नविन कात्रज बोगदा, कोळेवाडी, पुणे या ठिकाणी महिला सपना दिलीप पाटील (वय.३२,वर्ष.रा धकनवडी,पुणे )हिला आरोपी राम गिरी याने तिला चाकुने छातीत भोसकुन तिचा खुन केल्याने याच्याविरुध्द भारती विदयापीठ पोलीस स्टेशन येथे भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याप्रमाणे तपास पथकातील अधिकारी व अमंलदार आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकांतील पोलीस अधिकारी नितीन शिंदे,अकुंश कर्चे,पोलीस अमंलदार शिवदत्त गायकवाड यांना हा गुन्हा आरोपी राम किसन गिरी (वय.३४ वर्ष,रा. पोखरणी देवी,ता.पालम,जि. परभणी ) वेळु फाटा येथे असल्याची माहीती मिळाल्याने या स्टाफने तात्काळ वेळु फाटा येथे जावुन आरोपीला ताब्यात घेत,अधिक चौकशी केली असता,हा गुन्हा प्रेमसंबधाच्या झालेल्या वादातुन केल्याचे कबूल केला असुन,त्याला गुन्हयात अटक केली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह.पोलीस आयुक्त,रविंद्र शिसवे,अपर पोलीस आयुक्त डॉ.राजेंद्र डहाळे सागर पाटील,पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ पुणे शहर, श्रीमती सुषमा चव्हाण,सहाय्यक पोलीस आयुक्त,शजगन्नाथ कळसकर,वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरीक्षक,संगिता यादव, पोलीस निरीक्षक (गुन्हे),पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे,अंकुश कर्चे व तपास पथकांचे अंमलदार रविंद्र भोसले,शिवदत्त गायकवाड,रविंद्र चिप्पा,गणेश सुतार,सचिन पवार,निलेश खोमणे,योगेश सुळ,हर्षल शिंदे,अभिजीत जाधव, गणेश शेंडे,राहूल तांबे,धनाजी धोत्रे,नवनाथ खताळ,सचिन गाडे,आशिष गायकवाड,विक्रम सावंत,मंगेश बोराडे,जगदीश खेडकर,यांनी केली आहे.या गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संगिता यादव ह्या करीत आहेत.