बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे
बारामती शहरातील कसबा येथील शशिकांत खरात यांच्या वडीलांना कॅन्सर हा आजार झाला होता.आपण संत सद्गुरू बाळूमामाचे अवतार असल्याचे भासवत मनोहर भोसले यांनी कॅन्सर बरा करण्याच्या बहाण्याने २ लाख ५१ हजार रुपये घेतले. याबद्दल शशिकांत खरात यांनी बारामती तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर मनोहर मामा व त्याचे सहकारी विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा,ओंकार शिंदे यांच्यावर फसवणूक आणि जादू टोणा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिस स्थानिक गुन्हे शाखा व बारामती तालुका पोलिसांनी मनोहर मामाला शुक्रवारी सालपे (जि.सातारा) येथे फार्म हाऊसवर जाऊन ताब्यात घेतले आहे. त्यानंतर बारामती ग्रामीण पोलीस ठाण्यात आणत,त्याला अटक करण्यात आली.
आज मनाहर मामा यास बारामतीच्या जिल्हा सत्र न्यायालयात हजर केल्यानंतरबारामती कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.जे. गिऱ्हे यांनी ही कोठडी सुनावली आहे.आरोपीच्या वतीने आज अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी बाजु मांडली.तर पोलीस प्रशासनाच्या वतीने सरकारी वकील किरण सोनवणे यांनी बाजु मांडली.
दोन्ही बाजुचे युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश गि-हे
यांनी मनोहर मामा यास पाच दिवसांची पोलीस कोठडी
सुनावली आहे.दरम्यान, मनोहर मामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे.बनावट तक्रारदार उभा करुन या गुन्ह्याबाबत तीन वर्षांनंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मनोहर मामाच्या भक्तांसह समर्थकांची न्यायालय परीसरात गर्दी झाली
होती.
बातमी चौकट :
मनोहरमामा भोसले यांना केलेली अटक बेकायदा आहे. बनावट तक्रारदार उभा करुन सदरच्या गुन्ह्याबाबत तीन वर्षांनंतर बनावट गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपीचे वकील ठोंबरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.