बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील तब्बल साडेपाच लाखांचा मुद्देमाल हस्तगत करत,आरोपींना घेतले ताब्यात…
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती तालुक्यातील शिरवली येथील नीरा नदीच्या बंधाऱ्याचे एकूण २६ बर्गे,अंदाजे छत्तीस हजारांचे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याबाबत तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम ३७९,(३४) अनव्ये चोरीचा गुन्हा दाखल होता,याच गुन्ह्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने आरोपी युवराज आप्पाजी जगताप वय.२८ (रा.सासवड ता.पुरंदर,जि पुणे ) सत्यवान सर्जेराव सोनवणे वय.४० (रा.सोनोरी,ता.पुरंदर,जि. पुणे) प्रमोद अरविंद खरात वय.२६ (रा.शिरवली,ता.बारामती जि.पुणे) कादर कासीम शेख वय.४९ (रा.निसर्ग हाईट ३ मजला प्लॅट नं.७,मार्केटयाड पुणे यांना अटक केली आहे.
या गुन्ह्यातील मुद्देमाल हा शेतकऱ्यांच्या शेती सिंचनाच्या प्रश्नाशी निगडित असल्याने पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांना या गुन्ह्यातील आरोपी व मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.याच अनुषंगाने बारामती तालुक्यातील सांगवी येथे पेट्रोलिंग करीत असताना एक बलेरो पिकअप ताब्यात घेत, त्यातील दोन इसमास ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी त्यांचे शिरवली येथील एका साथीदाराच्या मदतीने हे गुन्हे केले असून, मुद्देमाल हा कोंढवा पुणे येथील भंगरवाल्यास विकला असल्याचे सांगितले,त्याठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून गुन्ह्यात गेला मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले बोलेरो पिकअप असा पाच लाख अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.हे गुन्हे केल्याबाबत आरोपींनी कबुली दिली आहे, त्याची अटकपूर्व वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेळके,बारामती तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण,
पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे
शिवाजी ननावरे,पोलीस कर्मचारी अनिल काळे,रविराज कोकरे, बाळासाहेब कारंडे,अभिजीत एकशिंगे,स्वप्निल अहिवळे काशिनाथ राजापुरे यांनी केली आहे.