मनोहर (मामा) भोसलेंना पोलिसांनी साताऱ्यातून घेतले ताब्यात…


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक : विकास कोकरे

सद्गुरू संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे भासवून,
अनेकांची आर्थिक लूट करणाऱ्या व गुन्ह्यात फरार असलेल्या स्वयंघोषीत मनोहर (मामा) भोसले (वय.३९,रा.उंदरगाव ता.करमाळा,जि.सोलापूर) याला पुणे ग्रामीण पोलिसांनी व बारामती तालुका पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले असून,मनोहर भोसले हे पोलिसांच्या ताब्यात आले असून लवकरच त्यांना बारामती येथे आणण्यात येणार असल्याची महिती तालुका पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी दिली.

मनोहर (मामा)भोसले,ओंकार शिंदे,विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा या तिघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात फसवणूकीसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष,अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा ( आक्षेपार्ह जाहिराती ) तसेच औषध चमत्कारी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती मधील फिर्यादी शशिकांत सुभाष खरात (रा.साठे नगर,कसबा,ता.बारामती,जि. पुणे ) याच्या वडीलांच्या
आजारपणाचा गैरफायदा घेत मनोहर भोसले यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फिर्यादीच्या वडीलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला,साखर,भंडारा खाण्यास दिला.विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडीलांच्या व फिर्यादीच्या जिवाची भिती घालत,खरात याच्याकडून तब्बल २ लाख ५१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली.पैसे मागितले असता जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

हा प्रकार कुठे होतोय ना होतोय तोपर्येत करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर (मामा) भोसलेंवर भादवी कलम ३७६ (ड),३७६ (n),३५४,३८५ आणि अंधश्रद्धा निर्मुलन कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,त्यामुळे मनोहर भोसलेंच्या अडचणी वाढल्या होत्या.त्याच्यावर मोठा राजकिय वरदहस्त असल्याचा भास मनोहर भोसलेंनी भासवल्यामुळे पुढे काय होते,याची उत्सुकता होती. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेत,त्याला बारामती तालुका पोलिस ठाण्यात आणत अटक केली जाणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *