करमाळा : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( मुख्य संपादक : विकास कोकरे )
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील आश्रमाचे प्रमुख तथाकथित,स्वयंघोषित मनोहर (मामा) भोसले यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहेत.मनोहर भोसले यांच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल होत आहेत.आणि अशातच आता मनोहर ( मामा) भोसले व त्यांच्या साथीदारांवर करमाळा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन करमाळा पोलिसांचे एक पथक मनोर मामांच्या अटकेसाठी रवाना झाले आहे दरम्यान या प्रकरणी भादवि कलम ३७६ (२),n,३७६ (ड),३५४,३८५ आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय..उंदरगाव येथे सद्गुरू संत बाळूमामांचा अवतार असल्याचं भासवून मनोहर भोसलेंनी अनेक भाविकांची फसवणूक देखील केली असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
या मठांमध्ये अनेक भाविक येत असतात,या भाविकांची बाळूमामांच्या नावाने आर्थिक लूट केल्याचा आरोप आदमापूरच्या सरपंच व सदस्यांनी केला होता.याप्रकरणी
बारामती येथे देखील मनोहर भोसले व त्याच्या साथीदारांवर जादू-टोण्याच्या कायद्यानुसार व फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत शशीकांत सुभाष खरात (रा.साठेनगर,कसबा,बारामती)कर्करोग बरा करतो असे सांगत बाभळीचा पाला, साखर,भंडाटा देत आरोपींनी लोकांची फसवणूक केली.या २३ वर्षीय तरुणाने फियदि दिली आहे.२० ऑगस्ट २०१८ ते ३१ ऑगस्ट २०२१ या दरम्यान हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोहर भोसले याने बाळूमामाचा अवतार असल्याचा बनाव करत फियदिीच्या वडिलांच्या गळ्यातील थायराईड कर्करोग बरा करतो,असे सांगतबाभळीचा पाला,साखर,भंडारा खाण्यास दिला.
विशाल वाघमारे, शिंदे यांच्याशी संगनमत करत वडिलांच्या व फिर्यादीच्या जिविताची भिती घालून फिर्यादीकडून वेळोवेळी २ लाख ५१ हजार रुपये घेत फसवणूक केली.तसेच पैसे परत मागितले असता त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचेही या फियदिीत म्हटले आहे.दरम्यान या प्रकरणी तिघांवर फसवणुकीसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ-अघोटी प्रथा व जादूटोणा व उच्चाटन कायदा तसेच औषध चमत्काटी उपाय अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांचाही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे.
मनोहर भोसले विरोधात आलेल्या गंभीर तक्रारीची पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी दखल घेतली आहे.