कॅन्सर बरा करतो म्हणून,बाभळीचा पाला देणाऱ्या स्वयंघोषित मनोहर (मामा) भोसले व त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल….


महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुश, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंध व उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (अक्षेपार्ह जाहीरात) अधिनियमान्वये गुन्हा दाखल.

बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज ( संपादक विकास कोकरे )

करमाळा तालुक्यातील उंदरगाव या ठिकाणी मठ बांधून राहणारे स्वयंघोषित मनोहर (मामा) भोसले व त्यांचे सहकारी विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा,ओंकार शिंदे यांच्याविरोधात फिर्यादी शशिकांत खरात ( रा.साठेनगर,कसबा,ता.बारामतीजि.पुणे ) यांनी फसवणूक केल्याबाबत दोन दिवसांपूर्वी तक्रार दिली होती,तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत,बारामती तालुका स्टेश पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोहर भोसले व त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध उच्चाटण कायदा व औषधे व चमत्कारी उपाय (आक्षेपार्ह जाहिरात) अधिनियमानव्ये स्वयंघोषित मनोहर (मामा)भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फियादी शशीकांत खरात यांचे वडीलांना थायरॉईड कॅन्सर हा दुर्धर आजार झाला,असताना यातील तकारदार हे मनोहर मामा भोसले (रा.उंदरगांव,ता.करमाळा,जि.सोलापुर ) या स्वयंघोषित मामांच्या,(मौजे.सावंतवाडी, गोजूबावी,ता.बारामती,जि.पुणे) मठामध्ये गेले असता त्याने तो सद्गुरू बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून तक्रारदार यांच्या वडीलांच्या गळयावरील थायरॉईड कॅन्सर बरा करतो असे सांगून त्यावरील औषध म्हणून बाभळीचा पाला,साखर,भंडारा खाण्यास देवून विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा व ओंकार शिंदे यांच्यासोबत संगणमत करून वेळोवेळी चढावा,अभिषेक व भेटीसाठी त्यांच्याकडून दोन लाख एक्कावन हजार रक्कम त्यांच्या व वडीलांचे जिवाचे बरे वाईट होईल अशी भिती घालून देण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली व पैसे परत मागीतल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप देखील तक्रारदार शशिकांत खरात यांनी केला आहे.

तालुका पोलिसांनी बारामती तालुक्यातील सर्व नागरीकांना आवाहन केले असून,संत सद्गुरू बाळूमामा यांचा अवतार असल्याचा बनाव करून मनोहर (मामा )भोसले यांनी व त्याच्या साथीदारांनी कोणाची फसवणुक वा भिती घालून पैसे देण्यास भाग पाडले असेल त्यांनी बारामती तालुका पोलीस स्टेशनला संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.या गुन्हयाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलींद मोहीते,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग नारायण शिरगावकर,बारामती ग्रामीण पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल घुगे हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *