पाटस येथील आकुबाई बबन आव्हाड यांचे अल्पशा आजाराने निधन..


पाटस : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

पाटस येथील आकुबाई बबन आव्हाड(वय ७४) यांचे शनिवार दिनांक ४ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा सून मुली नातवंडे असा परिवार आहे. अतिशय प्रेमळ आणि मनमिळाऊ स्वभाव अशी त्यांची ओळख होती . त्यांच्या निधनाने आव्हाड कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .

मोठ्या कष्टाने आकुबाई आव्हाड यांनी कुटुंबाची प्रगती केली . कधीही कोणाला न दुखावता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी आयुष्यात वाटचाल केली .

ईटिव्ही भारत चे दौंड प्रतिनिधी आणि दैनिक पुण्यनगरी चे पाटस येथील बातमीदार सचिन आव्हाड यांच्या त्या आजी होत्या .

दशक्रिया विधी : दशक्रिया विधी सोमवार दिनांक १३ रोजी सकाळी ९ वाजता पाटस येथील स्मशान भूमी येथे होणार आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *