दौंड : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
दौंड तालुक्यातील पाटस येथील बंद पडलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यातील गैव्यवहाराची चौकशी व्हावी, कारखाना पुन्हा सुरु व्हावा म्हणुन ज्या लढ्याला सुरुवात करत आहोत आहोत,त्याला जेष्ठ समासेवक आण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेऊन,त्याबाबतचे निवेदन दिल्याची माहिती माजी संचालक भीमा पाटस सहकारी साखर कारखाना नामदेव ताकवणे यांनी दिली आहे.तसेच भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला आण्णांनी पाठिंबा दिला असुन,जनआंदोलन उभारा अशी सूचना दिल्याची माहिती देखील ताकवणे यांनी दिली.याच मुद्द्यावरून मागील काही दिवसांपासून भीमा पाटसचे विद्यमान अध्यक्ष आमदार राहुल कुल आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी आमदार रमेश थोरात दोघांमधील आरोप-प्रत्यारोपाने तालुक्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.
या भीमा पाटस कारखान्याची सहकार आयुक्त आणि साखर आयुक्त यांनी चौकशी करावी अशी मागणी रमेश थोरात यांनी केली होती.त्यावर चौकशी करायची,तर कारखाना स्थापनेपासून करावी अशी मागणी कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल यांनी केली होती.याच मुद्द्यावरून भीमा पाटसचे संस्थापक अध्यक्ष कै.मधुकर काका शितोळे यांचे चिरंजीव आणि भीमा पाटसचे माजी उपाध्यक्ष सत्वशील शितोळे व पुतणे माजी संचालक योगेंद्र शितोळे यांनी आमदार कुल यांना धारेवर धरले होते.कुल यांच्या मनमानी कारभारामुळेच कारखाना आर्थिक संकटात सापडला असून कुल यांच्या काळातच भीमा पाटस कारखान्यात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे,अशी टीका कुल यांच्यावर केली होती. त्यानंतर भाजपचे नेते आणि भीमा पाटस चे माजी संचालक नामदेव ताकवणे यांनी या वादात उडी घेतली.काही दिवसांपूर्वी दौंड येथे पत्रकार परिषद घेऊन आमदार कुल आणि रमेश थोरात हे दोघेही शेतकरी सभासद, कामगार आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत.
ते दोघेही संगनमताने राजकीय डाव खेळत आहेत असा आरोप केला.भीमा पाटस कारखान्याच्या स्थापनेपासून ईडीमार्फत चौकशी करण्या संदर्भात मी स्वतः तक्रार दाखल करणार आहे,चौकशीनंतर दोषींची दिवाळी ही जेलमध्ये असेल असे वक्तव्य केले होते. ऊस उत्पादक सभासद आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी भीमा पाटस पुन्हा सुरू झाला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती.भीमा पाटस सहकारी साखर कारखाना तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना असून, तालुक्यातील शेतकरी बांधव देखील कारखाना कधी चालू होणार आहे याकडे लक्ष देऊन आहेत.’जन आंदोलन’ उभारल्यानंतर शेतकरी वर्गाची काय भूमिका राहते ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.