बारामती तालुका पोलीस ठाण्यात दुसरी फसवणुकीची तक्रार दाखल….
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज (संपादक : विकास कोकरे )
करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथे मठ बांधून लोकांची आर्थिकदृष्ट्या लूट करून स्वयंघोषित मामा म्हणून मिरवल्या जाणाऱ्या मनोहर भोसलेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.मनोहर भोसले हे सद्गुरू बाळूमामांचे नाव वापरून अनेक लोकांची फसवणूक करत असल्याचा आरोप बारामतीमधील तक्रारदार शशिकांत सुभाष खरात (रा.साठेनगर,कसबा, बारामती )यांनी केला आहे.खरात यांनी दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये त्यांनी मनोहर भोसलेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे.खरात यांनी दिलेल्या तक्रारीमध्ये त्यांनी म्हणटले आहे की,माझ्या वडीलांच्या आजारपणासाठी मी माझा मित्र शिवाजी पवार यांच्या सांगण्यावरून बारामती तालुक्यात असणाऱ्या ( सावंतवाडी गोजूबावी,ता. बारामती,जि.पुणे ) येथील मनोहर भोसले यांच्या मठावर आशीर्वाद घेण्यासाठी गेलो असता,त्याठिकाणी
माझ्याकडून पाच ५ हजारांची पावती फाडली.
मी मठाच्या बाहेर मनोहर भोसले यांचा सेवक विशाल वाघमारे (नाथ बाबा) यांना माझी हकीकत सांगुन पैसे दिले व मठातील मनोहर भोसले यांनी माझ्या वडीलांना कॅन्सर असल्याचे चिट्ठीवर लिहून देत बाभळीचा पाला,साखर व आयुर्वेदीक औषध म्हणुन घे.आशिर्वाद करतो असे सांगुन पाच अमवस्येला अभिषेक घालण्यास सांगितल,प्रत्येक अभिषेक हा अमवस्येला करून,प्रत्येक अभिषेकाला त १३०० खर्च सांगुन अमवस्येला वडीलांना बरोबर घेण्यास सांगितले.पहिल्याच महिन्यातील अमावस्येला गेल्यावर मनोहर भोसल यांनी एक लाख पंचवीस हजार रूपये गुरूवारी आणुन दे तुझ्या वडीलांना निट करतो”असे सांगितले,मी माझ्या मित्रांकडुन पैसे घेत मनोहर भोसलेंना दिले.एवढं होऊन सुद्धा माझ्या वडिलांना पुन्हा त्रास होऊ लागला व डॉक्टरांनी ऑपरेशन करावे लागेल म्हणून सांगितले.
त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो व सर्व हकीकत त्यांना सांगितले.तुझ्या वडीलांचे ऑपरेशन होवू देत नाही विना ऑपरेशनचे निट करतो,”माझ्या उंदरगावच्या मठाच्या बाजूला नाथबाबाला घेवून जा” तेथील झाडाखाली एक लाख रूपये चा चढावा ठेवा” त्याप्रमाणे मी एक लाख रूपयांचा चढावा ठेवला,त्यांनी सांगितल्या प्रमाणे पाठीमागे न बघता मठामध्ये येवून पायावर पाणी घेतले मात्र माझ्या वडीलांना कोणताही फरक पडला नाही व त्यांचे ऑपरेशन होवून त्यांना मनोहर भोसलेंच्या फसवणुकी मुळे कर्जबाजारी पनाला सामोरे जावे लागले.यामुळे मी मनोहर भोसलेंच्या उंदरगावच्या मठात
जाऊन तेथील सेवक ओंकार शिंदे यांस मनोहर भोसले यांना दिलेले पैसे माझे मला पैसे परत द्यावेत त्यावर त्यांनी मामांना निरोप देतो असे सांगत,या गोष्टींची वाच्यता कुठेही करू नकोस तुझे पैसे तुला दोन दिवसात मिळवुन देतो परंतु दोन दिवसात पैसे न मिळाल्याने,मी पुन्हा पैसे मागण्यास गेलो असता,मला ओंकार शिंदे याने जीवे मारण्याची धमकी देत मनोहर मामा हे मंत्री पोलीस,खिशात घेवून फिरतात तुला काय करायचे ते कर तु आमचे काहीही वाकडे करू शकत नाही.या प्रकारांमुळे खरात कुटुंबीय दबावाखाली जगत असून,आज त्यांनी नाइलाजासत्व तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली.खरात यांचे दोन लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक झाली असून,अशाच प्रकारे मनोहर भोसले यांच्या बऱ्याच ठिकाणाहून अशा तक्रारी येत असल्यामुळे त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअन्वये कारवाई व्हावी अशी मागणी जनसामान्य लोकांचे होत आहे.