स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडेच्या अडचणीत वाढ…


खंडणीच्या गुन्हानंतर पत्नीची कौटुंबिक छळाची तक्रार,आता एका तरुणीचा बलात्काराचा आरोप….

अहमदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

जुन्नर येथील स्वयंघोषित शिवभक्त,सामाजिक कार्यकर्ता आणि शिवऋण संस्थेचा संस्थापक अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.कारण
त्याच्याविरोधात आज ( दि.०६ सप्टेंबर)रोजी नव्याने आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका तरुणीने अक्षय बोऱ्हाडे विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा
आरोप केला आहे.याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे अक्षय बो-हाडेच्या अडचणींमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे.जुन्नरचे माजी नगरसेवक आणि एचपी गॅस वितरक रुपेश शहा यांच्याकडून खंडणी मागितल्या प्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली होती.

हे प्रकरण ताजं असतानाच अक्षय बोऱ्हाडेची पत्नी रुपाली हिने आपल्या पतीवर कौटुंबिक छळाचा गंभीर आरोप केले. त्यानंतर आता आणखी एका तरुणीने अक्षय विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे अक्षयच्या पत्नीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अक्षयने इतर मुलींची फसवणूक केल्याचं वक्तव्य केलं होतं.त्यानंतर आता एका मुलीने त्याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे.रुपाली बोऱ्हाडे यांनी पती अक्षय आणि त्याच्या कुटुंबियांविरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन भादवी कलम ४९८(अ),४२०,४०६,३२४ ३२३,५०४, ५०६ (३४)शस्त्र आधिनियम २५ (अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

रुपाली यांनी जुन्नरच्या एका स्थानिक पोर्टलला दिलेल्या
मुलाखतीत अक्षयसोबत आपली पहिली भेट कधी झाली,तेव्हा पासून ते आतापर्यंतच्या सविस्तर घडामोडी सांगितल्या आहेत. रुपाली यांची अक्षयसोबत चर्चा वर्षांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून भेट झाली होती,त्यावेळी रुपाली या कल्याणमध्ये एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत होत्या.अक्षय यानेच आपल्याला लग्नाची मागणी घातलेली,असंही रुपाली यांनी या मुलाखतीत सांगितलं.अक्षय बोऱ्हाडे रस्त्यावरील किंवा फुटपाथवरील अपंगाची सेवा करतो,असं आपल्याला सोशल मीडियाद्वारे विविध व्हिडीओमधून समजलं. कल्याण रेल्वे स्थानकावर एक अपंग महिला आपण बघितली. त्याबाबत आपण फेसबुकद्वारे अक्षयसोबत संपर्क करुन माहिती दिली.त्यावेळी त्याने कल्याणला जेव्हा येऊ तेव्हा त्यांना घेऊन जाऊ,असं सांगितल याच मुद्द्यावरुन एकमेकांचे नंबर शेअर करण्यात आले.त्यातून दोघांमध्ये बोलणं सुरु झाले आणि काही दिवसांनी अक्षयने आपल्याला प्रपोज केलं,असं रुपाली यांनी सांगितलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *