तात्काळ नियुक्ती करा,अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन उभारण्याचा भाजपाचा ईशारा..
बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
बारामती नगरपालिकेचा कारभार दोन ते तीन महिने मुख्याधिकार्यांविना चालू आहे त्यामुळे नगरपालिकेच्या कामकाजात सर्वसामान्यांना लोकांना व जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असून अनेक कामात अडीअडचणी निर्माण होत आहेत.नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी पद रिकामे असल्याने प्रभारी अधिकारी सातत्याने गैरहजर असतात त्यामुळे कायम मुख्याधिकारी पूर्णवेळ नगरपरिषदेस आवश्यक आहे, बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने तसेच करून रुग्ण वाढीस नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच बारामतीमधील विविध प्रश्न समस्या सोडवण्यासाठी त्यामुळे बारामती नगर परिषदेमध्ये विविध कामे घेऊन येणारे नागरिकांची अत्यंत गैरसोय होत आहे.
ही गैरसोय दूर करण्यासाठी शासनाने तात्काळ बारामती नगर परिषदेमध्ये कायमस्वरूपी मुख्य अधिकारी यांची नियुक्त करावी.कोरोणा रुग्णांची संख्या पाहता बारामतीत मुख्याधिकारी नसणं ही फार लाजिरवाणी बाब आहे.यामुळे शासनाने लवकरात लवकर मुख्याधिकारी पद भरावे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस साजन अडसूळ यांनी दिला आहे.अशा आशयाचे निवेदन प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी निवेदन देताना भाजपचे पश्चिम महाराष्ट्राचे सोशल मीडियाचे सहसंयोजक अक्षय गायकवाड,कामगार आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संजय दराडे,शैलेश खरात,सचिन मोरे,सागर भिसे,मयूर खंडाळे उपस्थित होते.