अहमदनगर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज
अहमदनगर येथे आशीर्वाद लॉन्स येथे वंचित बहुजन आघाडीच्या संघटन समीक्षा व संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी महिला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांच्या हस्ते ३०० ते ४०० महिला कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहिर प्रवेश केला यासाठी जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे व युवा आघाडी जिल्हा महासचिव विशाल साबळे यांच्या नेतृत्वाखाली या महिलांनी वंचित बहुजन आघाडीत पक्ष प्रवेश केला.
या मेळाव्यास वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर,प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी,महिला आघाडी प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाठ,प्रदेश उपाध्यक्ष किसन चव्हाण,ॲड अरूण जाधव,अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रतिक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जठार,युवा आघाडी जिल्हा महासचिव विशाल साबळे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गलांडे,जिल्हा सल्लागार जिवन पारधे,सचिव चंद्रकांत नेटके संघटक फिरोज पठाण,चंद्रकांत डोलारे,युवा आघाडीचे सागर ढगे,प्रसाद भिवसने,मयूर ओहळ,शहर जिल्हाध्यक्ष संजय जगताप, भाऊसाहेब भिंगारदिवे सर्व तालुका अध्यक्ष व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.