शेवटच्या श्रावणी सोमवारी भाविकांना दर्शनाची ओढ…मंदिर मात्र बंद…एलईडी स्क्रीनद्वारे भाविकांच्या दर्शनाची सोय….


सोमेश्वर : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज

श्रावण महिन्यातील आजचा शेवटचा श्रावणी सोमवार असून आज तरी दर्शन मिळेल,या आशेवर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविक भक्तांना कळस दर्शन घेऊनच माघारी फिरावे लागत आहे.मात्र देवस्थानने मंदिराबाहेर सोमेश्वर मोरगाव रस्त्यावर एलईडी स्क्रीन लावून गाभाऱ्यातील दर्शनाचे लाईव्ह दर्शन दिले जात आहे.शेवटचा सोमवार त्यात सोमवती अमावास्या आहे श्रावणमास संपत आहे.सोरटी सोमनाथचे प्रतिरूप मानले जाणारे सोमेश्वर मंदिर कोरोनाच्या पाश्र्वभूमीवरती बंद आहे.सर्व पूजाविधी सध्या पार पडले जात आहेत.भाविकांना कळस दर्शनाबरोबरच स्वयंभू सोमेश्वर लिंगाचे दर्शन व्हावे म्हणून,
एलईडी स्क्रीन सोय करण्यात आली आहे.

सोमेश्वर मंदिर परिसरातील स्थानिक भाविक नित्यनियमाने दुरूनच कळस दर्शन घेत असतात या दर्शनाबरोबर स्वयंभू सोमेश्वर लिंगाचे दर्शन व्हावे म्हणून भाविक प्रदीप भगवानराव काकडे यांच्यातर्फे ही स्क्रीन लावण्यात आली आहे.वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळपासूनच सोमेश्वर मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मंदिरातील आतील बाजूस पुष्प सजावट भाविक मयूर बोबडे यांच्यातर्फे करण्यात आली असल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *