पिंपळी येथे विविध विकास कामांचा भूमिपुजन समारंभ व कोरोना योद्धांचा सन्मान कार्यक्रम संपन्न


बारामती : महाराष्ट्र टुडे लाईव्ह न्यूज


महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या सहकार्यातून आणि छत्रपती कारखाना भवानीनगर चे संचालक संतोषराव ढवाण पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांचे पाठपुराव्याने पिंपळी-लिमटेक गावातील अंदाजे साडेचार कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

      त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना काळात  जीवाची पर्वा न करता लोकांच्या सुरक्षेतेसाठी गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून रात्रंदिवस काम करणाऱ्या देवदुतांचा सत्कार "कोरोना योद्धा" म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन ग्रामपंचायत पिंपळी-लिमटेक व संचालक संतोषराव ढवाण-पाटील यांचे वतीने आणि महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार,तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, पंचायत समिती सदस्य भारत गावडे,

बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,गटविकास अधिकारी अनिल बागल, संचालक संतोषराव ढवाण पाटील,सरपंच मंगल हरिभाऊ केसकर,उपसरपंच राहुल बनकर व ग्रामपंचायत सदस्य यांचे हस्ते करण्यात आला.
पिंपळी गावात आरोग्य विभागाच्या वतीने उल्लेखनीय कामगिरी करणारे आरोग्य सेवक राहुल घुले, आरोग्य सेविका नफिसा तांबोळी, आरोग्य विभाग सी.एच.ओ.डॉ.दिपाली शिंदे,लिमटेक जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक बजरंग जाधव सर, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे, अनिल बनकर, प्रसन्ना थोरात,सतिश शिंदे,सोपान थोरात महादेव खोमणे,मल्हारी खोमणे तसेच पिंपळी-लिमटेक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक-शिक्षिका,हौसाबाई पांडुरंग घोरपडे विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, गावातील सर्व अंगणवाडी सेविका-मदतनीस,आशा सेविका त्याचप्रमाणे तालुक्यातील व पिंपळी गावातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना स्वतः चारचाकी गाडीतून जीवाची पर्वा न करता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे औषधे पुरविणे ते डिस्चार्ज घेऊन घरी सुखरूप सोडे पर्यंत मदत करणे,संचालक ढवाण पाटील यांचे माध्यमातून गरजू लोकांना अन्नधान्य- पालेभाज्या पुरविणे, सॅनिटायजर फवारणी आदी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडियाचे अध्यक्ष व. मा. ग्रामपंचायत सदस्य सुनिल बनसोडे यांचा व रविराज ॲग्रो चे चेअरमन अजित सस्ते यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावा बरोबरच पिंपळी गावात देखील रस्ते निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रोक्लोराईड व सॅनिटायजरचे मोफत वाटप केल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार सन्मान ग्रामपंचायत व ढवाण पाटील यांचे वतीने चेअरमन राजेंद्र पवार,तालुकाध्यक्ष संभाजी होळकर,पंचायत समिती सदस्य भारत गावडे,गटविकास अधिकारी अनिल बागल व पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे यांचे हास्ते कोविड योद्धा म्हणून सन्माचिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आला.


भूमिपूजन व कोविड योध्दा कार्यक्रम प्रसंगी मार्गदर्शन करतांना राजेंद्र पवार म्हणाले गावाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने ग्रामपंचायत पिंपळी-लिमटेक च्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे पाठपुरावा करून पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री यांचे माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचा योग्य प्रकारे पदाधिकारी व गावकऱ्यांनी उपयोग करून घ्यावा. तसेच रस्ते कॉन्ट्रॅक्टर यांनी देखील उत्तम दर्जाची कामे करावीत अशा सूचना दिल्या.
कोरोना काळात काम करणारे सर्व कोरोना योद्धे यांचा सन्मान होणे ही अभिमानाची गोष्ट असून त्यांचे कार्य अदभूत असेच आहे.त्यांचा सन्मान म्हणजे सन्माचाच सन्मान असल्याचे गौरवोद्गार देखील त्यांनी काढले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील सर्व गावात तसेच पिंपळी लिमटेक गावासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्फत मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झाला आहे. सदर निधीचा चांगला उपयोग करून अजित पवार यांना अभिप्रेत असलेली दर्जेदार स्वरूपाची कामे करून व्हावीत.गावातील दोन्ही पार्टीने एकत्र बसून रस्त्याच्या अडीअडचणी दूर करून सहकार्य करावे. कमी बिलोने कामे घेतली म्हणून कॉन्ट्रॅक्टर वर्गाने कामे निकृष्ट दर्जाची करू नयेत.काही कामे प्रलंबित असतील तर ती ही नेत्यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यात येतील तसेच अजित पवार यांचे वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेला कोरोना योद्धा सन्मान हा सर्वांसाठी सोहळा असून आरोग्यदूतांच्या कार्याला तोड नाही. त्यांचे कार्य सर्व जनतेसाठी जीवनदायी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते आपली जबाबदारी पार पाडत असतात.त्यांचा सन्मान होणेही खऱ्या अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे.
प्रास्ताविकात संचालक संतोषराव ढवाण-पाटील बोलताना म्हणाले उपमुख्यमंत्री अजित पवार,आमदार रोहित पवार व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांचे माध्यमातून मिळालेल्या निधीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ तसेच उर्वरित विकास कामांच्या निधीसाठी सरपंच व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल.उपस्थित सर्वांचे मान्यवर व नागरिकांचे स्वागत सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी केले तर आभार सदस्या स्वाती अशोक ढवाण-पाटील यांनी मानले.

यावेळी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पवार व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,पंचायत समिती सदस्य भारत गावडे,बारामती शहर पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, संचालक संतोषराव ढवाण पाटील खरेदी-विक्री संघाचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब भिसे, बांधकाम उपअभियंता बी.के.कांबळे,सरपंच मंगल हरिभाऊ केसकर, उपसरपंच राहुल बनकर,बारामती संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सुनिल बनसोडे,बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रमेशराव ढवाण-पाटील ग्रामपंचायत सदस्य आबासाहेब देवकाते-पाटील,अजित थोरात, वैभव पवार, उमेश पिसाळ, सदस्य स्वाती ढवाण पाटील,अश्विनी बनसोडे,मंगल खिलारे, मिनाक्षी देवकाते पाटील, निर्मला यादव, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब भोईटे,पोलीस पाटील मोहन बनकर, पिंपळी विविध विकास सोसायटीचे सदस्य अशोकराव देवकाते पाटील, तंटामुक्तीचे मा.अध्यक्ष रमेश देवकाते,सर्व रस्ते कॉन्ट्रॅक्टर, ग्रामस्थ अशोकराव ढवाण-पाटील,हरिभाऊ केसकर, पप्पू टेंबरे,ॲड.सचिन वाघ,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विजय बाबर,शेतकरी संघटनेचे विकास बाबर, सोना देवकाते पाटील,आनंदराव देवकाते,लालासाहेब चांडे,तुळशीदास केसकर,अविनाश थोरात,महेश चौधरी, उत्तम मदने,कालिदास खोमणे, दिपक वाघ,अशोक थोरात, बापू केसकर,पद्माकांत निकम, रघुनाथ देवकाते,प्रदिप यादव,नितीन देवकाते आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *